मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

05 January 2021

मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडामुंबई : मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. यासाठी गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरु केली असून 'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा', असा नाराच शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनं सडकून टीका केली आहे.

२०२०मध्ये होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेत आत्तापासूनच चढाओढ लागल्याचे दिसतेय. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे. तसंच, भाजपा सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार आहे. एकीकडे शिवसेनेनंही भाजपला मात देण्यासाठी मोहिम आखली आहे.

मुंबई मा जलेबी ने फाफडा; उद्धव ठाकरे आपडा, अशी टॅगलाइन देत शिवसेनेनं गुजराती मेळावा आयोजित केला आहे. यावरुनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद. शिवसेनेनं साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, जनाबसेनेला आपटा’, असं म्हणत शिवसेनेच्या या मोहिमेवर अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. तसंच. नेमकं काय? मराठी अस्मिता, अजान स्पर्धा की फाफडा?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

Post Top Ad

test