एका मिनिटांत 10 हजार तिकिटांचे बुकिंगनवी दिल्ली, : रेल्वे तिकीट बुक करणे आता अधिकच सुलभ झाले आहे. कारण आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार तिकिटांचे बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकिटे बुक होतात.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल आज गुरुवारी आयआरसीटीसीच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले. हे संकेतस्थळ आता अद्ययावत करण्यात आले असून, त्यामुळे तिकीट बुकिंगचा वेग वाढणार आहे. परिणामी प्रवाशांना आधीच्या तुलनेत जास्त वेगाने तिकीट बुक करता येणार आहे. या संकेतस्थळावर खाण्यापिण्यासह इतर सुविधाही मिळणार आहेत.

रेल्वेमंत्री गोयल म्हणाले की, आयआरसीटीसीचे संकेतस्थळ हे रेल्वे प्रवाशांसाठी संपर्काचे पहिले केंद्र आहे. त्यामुळे प्रवाशांना येणारा अनुभव चांगला असावा. नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा ओढा आरक्षण खिडकीवर जाण्याऐवजी आभासी तिकीट बुक करण्यावर आहे. यासाठीच आयआरसीटीसीचे संकेतस्थळ सातत्याने अद्ययावत करण्याची आवश्यकता असते.
Previous Post Next Post