करोनाच्या कोविशिल्ड लशीला आपत्कालीन मंजुरी

0


नवी दिल्ली : गेले वर्ष कोरोनाशी युद्ध करण्यात गेले. मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सीरम इन्स्टीट्यूटने निर्मिती केलेल्या 'कोविशिल्ड' या करोनाच्या लशीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. करोना लशीबाबत विचार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तज्ञ समितीच्या बैठकीत फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्यूट या तिन्ही कंपन्यांना आपले प्रेझेंटेशन द्यायचे होते. या बैठकीत झायडस कॅडिला देखील सहभागी झाली. सीरम इन्स्टीट्यूटचे प्रेझेंटेशन झाल्यानंतर कोविशिल्डला मंजुरी देण्यात आली. तज्ञांच्या समितीच्या बैठकीत भारत बायोटेकच्या प्रेझेंटेशननंतर शेवटी फायझरचे प्रेझेंटेशन होणार आहे. 

तज्ञांच्या या समितीच्या दोन बैठका झालेल्या आहेत. या बैठकांमध्ये लस निर्मिती कंपन्यांकडून माहिती मागवण्यात आली होती. या बैठकीतून चांगले वृत्त हाती आल्यानंतर काही तासांमध्येच लोकांना पहिला लशीचा डोस देण्याबाबतचे वृत्त देखील मिळणार आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. भारताने करोनाचा पराभव करण्याची तयारी पूर्ण केली आहे. संपूर्ण अॅक्शन प्लान तयार आहे. भारतात लस देण्याची मोहीम इतकी व्यापक असणार आहे की, ते पाहून जगभर आश्चर्य व्यक्त केले जाईल, असेही बोलले जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)