अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स, बुधवारी चौकशी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 April 2021

अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स, बुधवारी चौकशीमुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज सीबीआयने समन्स बजावले आहे. या प्रकरणी आता अनिल देशमुख यांची बुधवारी १४ एप्रिल रोजी चौकशी होणार आहे. 

या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची परवानगी दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाकडूनही देशमुख यांना दिलासा मिळाला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यावेळी देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची प्राथमिक चौकशी व्हावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार दिला. १५ दिवसांमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.


Post Top Ad

test