दिलासा... मुंबईत दिवसभरात 5542 नवीन रुग्ण - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 April 2021

दिलासा... मुंबईत दिवसभरात 5542 नवीन रुग्णमुंबई - मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या आता घटते असून शनिवारी व रविवारी सलग दोन दिवसांत तब्बल 1679 ने रु्ग्ण कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी 23 एप्रिलला रुग्णसंख्या 7221 वर होती. शनिवारी ही संख्या घटून 5888 वर आली. तर रविवारी आणखी कमी होऊन रुग्णांची संख्या 5542 झाली. तर 8778 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात 64 रुग्णांचा मृत्यू झाला. 

मुंबईत झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या मागील 10 ते 12 दिवसांपासून स्थिर राहिली होती. 23 एप्रिलला रुग्णांची संख्या 7221 वर होती. ही रुग्णसंख्या घटते आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईत आतापर्यंत 627651 रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 537711 रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 12783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची आकडेवारीही कमी झाली आहे. ११ एप्रिलपर्यंत ९२,४६४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. ही संख्या 25 एप्रिलला कमी होऊन 75740 वर आली आहे. घटणा-या रुग्णसंख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे.

Post Top Ad

test