इमारतीतील रहिवाशांच्या अँटीबॉडीजच्या प्रमाणात वाढ - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 April 2021

इमारतीतील रहिवाशांच्या अँटीबॉडीजच्या प्रमाणात वाढमुंबई - मुंबईतील उंच इमारतींमधील रहिवाशांमध्ये अ‍ॅटीबॉडिजच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दाटीवाटीच्या आणि झोपडपट्टीतील रहिवाशांच्या रोगप्रतिकारक शक्तीत (अँटीबॉडिज) घट झाली आहे. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर करण्यात आलेल्या तिसºया सेरो सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात ३६ टक्के नागरीकांमध्ये कोरोना रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण ३५ टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण ३७ टक्के इतके आहे.

मुंबई महापालिके ने नमुना निवड पद्धतीचा उपयोग करून सेरो सर्वेक्षण केले आहे. सेरो सर्वेक्षणाच्या तिसºया टप्प्यात १० हजार १९७ नागरीकांच्या रक्ताचे नमुन तपासण्यात आले. यात रक्तांमध्ये कोविड विषाणू विरोधात अँटिबॉडीज तयार झाली आहेत का हे पाहाण्यात आले. रक्तात अँटिबॉडीज तयार होणे म्हणजे आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार होणे. अशी रोगप्रतिकार शक्ती मुंबईतील ३६.३० टक्के नागरीकांमध्ये आढळली आहे. यापूर्वी दोनवेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले असून हे तिसरे सर्वेक्षण आहे.

या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे.आॅगस्ट २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात २७ टक्के नागरीकांमध्ये अ‍ँटीबॉडिजचे प्रमाण आढळले होते. मात्र, हे सर्वेक्षण काही प्रभागातच झाले होते. जुलै २०२० मध्ये काही प्रभागात झालेल्या सर्वेक्षणात झोपडपट्टीतील ५७ टक्के नागरीकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळली होती. त्यानंतर आॅगस्ट २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण ४५ टक्क्यांवर आले. तर आता हे प्रमाण ४१.६ टक्क्यांपर्यंत खाली आहे. तर झोपडपट्टी वगळता इतर भागातील नागरीकांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. जुलै महिन्याच्या सर्वेक्षणात १६ टक्के,आॅगस्ट मध्ये १८ टक्के आणि मार्च २०२१ च्या सर्वेक्षणात हे प्रमाण २८.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कोरोनाचे सध्या इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. अशा इमारतींमधील रहिवाशांमध्ये अँटिबॉडीजमध्ये वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

महिलांमध्ये प्रमाण जास्त -
पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती आढळून आली आहे. ३५.०२ टक्के पुरुषांमध्ये तर ३७.१२ टक्के महिलांमध्ये अ‍ँटिबॉडिज तयार झाल्याचे सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आले आहे.

Post Top Ad

test