लस नसल्याने ४५ वयोगटावरील लसीकरण बंद - १८ ते ४४ वयोगटाचेच लसीकरण

JPN NEWS
0


मुंबई - कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे सोमवारी, 3 मे रोजी 45 वयोगटावरील नागरिकांसाचे लसीकरण होणार नाही. मात्र १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण के ले जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, पालिका आणि खासगी अशा पाच लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरु राहिल. ज्या नागरिकांनी कोविन अ‍ॅपमध्ये नोंदणी केली आहे, त्यांचे लसीकरण केले जाणार असल्याने नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. 

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्र्दी करीत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊ नये. पालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्र्दी करू नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत, बृहन्मुंबई महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ६३ केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण 136 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्या कारणामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात सोमवारी,३ मे रोजी ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होवू शकणार नाही. दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे महानगरपालिकेच्या पाच लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ५०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

या कें द्रांवर होणार लसीकरण -
१) बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
2) सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
३) डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
४) सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
५) वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !