मुंबईत २६७८ नवीन रुग्णांची नोंद, ३६०८ रुग्णांची कोरोनावर मात - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 May 2021

मुंबईत २६७८ नवीन रुग्णांची नोंद, ३६०८ रुग्णांची कोरोनावर मातमुंबई - मुंबईत २४ तासांत २६७८ रुग्ण आढळले असून ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभऱात ३६०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना चाचण्या ३३३७८ करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली. मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या घटते आहे. शुक्रवारी ३,०३९ रुग्णांची नोंद झाली होती. शनिवारी ही रुग्णसंख्या घटून २६७८ वर आली आहे.

आतापर्यंत रुग्णांची संख्या ६७४०७२ वर पोहचली आहे. यातील ६१००४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण १३७४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८४८४ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्केवर गेला आहे. रुग्ण दुपटीचा दर १४५ दिवसांवर पोहचला आहे.

Post Top Ad

test