काेराेना चाचण्यांसाठी पुढाकार घ्या, पालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

03 May 2021

काेराेना चाचण्यांसाठी पुढाकार घ्या, पालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहनमुंबई - काेराेनाला राेखण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चाचण्या करून घ्याव्यात, असे आवाहन पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांना केले आहे. त्यासाठी पालिकेच्या आराेग्य खात्याची यंत्रणा विभागवार सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गेल्या फेब्रूवारी महिन्यात मुंबईत दरराेज 24 हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर गेल्या एप्रिल महिण्यात दरराेज सुमारे 44 हजार चाचण्या करण्यात आल्या. गेल्या काही दिवसापासून सुमारे 50 हजारापर्यंत गेलेल्या चाचण्यांची संख्या आता आता 28 हजारावर आली आहे. काेराेनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि काेराेनाला राेखण्यासाठी आपण सुरू केलेल्या लसीकरणाच्या धडाकेबाज माेहिमेची गती मंदावली असून चाचण्यांसाठी पुन्हा वेग द्यायला हवा त्यासाठी नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त चहल यांनी केले आहे. दरराेज किमान 40 हजार नागरिकांच्या काेराेनाच्या चाचण्या करण्याचे लक्ष असून काेराेचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी अथिकाधिक नागरिकांनी चाचण्या करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुट्टयांमुळे चाचण्यांमध्ये घट
गेल्या रविवारी 28 हजार 636 चाचण्या करण्यात आल्या. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने चाचण्यांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. आतापर्यंत 54 लाख 90 हजार 241 काेराेना चाचण्या झाल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य खात्याने दिली आहे.

Post Top Ad

test