मुंबईत कोविड बाधित रुग्णांना बेडची विक्री, एफआर दाखल करा - आयुक्तांचे निर्देश

Anonymous
0


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड आरक्षित बेडची अनधिकृतपणे विक्री होत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मुंबईत बेडची विक्री केली जात नाही, याबाबत पसरवण्यात आलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, अफवा पसरवणा-या व्यक्तिंवर एफआर दाखल करा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. या संबंधित सर्व अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना महापालिकेच्या रुग्णालयांमधील बेड वितरणाबाबत अत्यंत काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. त्यांचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियंत्रण कक्षांद्वारे केले जात आहे. या विषयीची सर्व माहिती संबंधित संगणकीय प्रणालीच्या डॅशबोर्डवर उपलब्ध आहे. ही नियमितपणे अद्ययावत होत असते. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच बेडची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना किंवा महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला द्यावी, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रुग्णालयात पुरेसा बेड उपलब्ध -
मुंबई महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये सध्या एकूण २२ हजार ५६४ रुग्णशय्या आहेत. यापैकी १० हजार ८२९ बेड सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील ८० टक्के रुग्णशय्या या कोविड बाधित रुग्णांसाठी राखीव असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

बेडचे वितरण विभागीय वॉर्ड वॉररुममधून -
महानगरपालिकेच्या सर्व विभागस्तरीय वॉर्ड वॉररूमद्वारे करण्यात येते आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार ज्यांना रुग्णालयांमध्ये बेडची आवश्यकता आहे, त्यांनी महानगरपालिकेच्या संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)