भारतात काही आठवडे पूर्ण लॉकडाऊन करा

0


वॉशिंग्टन : भारतात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यातच आरोग्य सुविधा अपुर्या आहेत. भारतातली कोरोना संसर्गाची सध्याची परिस्थिती पाहता तातडीने काही आठवडय़ांसाठी लॉकडाऊन केल्यास कोरोनाचे दुष्टचक्र थांबू शकेल, असा सल्ला अमेरिकन अध्यक्षांचे सल्लागार आणि अमेरिकेतील कोरोना लढय़ाचे प्रमुख डॉ. अँथनी फाउची यांनी दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे ते मुख्य वैद्यकीय सल्लागार आहेत. डॉ. अँथनी यांची इंग्रजी वर्तमानपत्राने मुलाखत घेतली. त्यात त्यांनी भारताला हा सल्ला दिला आहे.

ते म्हणाले की, सध्या भारतातली स्थिती खूप अवघड असून, तातडीने काहीतरी करण्याची गरज आहे. काही आठवडय़ांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास तातडीच्या, नजीकच्या भविष्यातल्या आणि दीर्घकालीन भविष्यातल्या उपाययोजना करण्यासाठी वेळ मिळू शकेल. भारतातील सध्याची स्थिती पाहता तातडीने पावले उचण्याची गरज आहे. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)