डोंबिवलीत म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला बळी

Anonymous
0


डोंबिवली - कल्याण – डोंबिवलीत म्युकरमायकोसिस पहिला बळी गेला आहे. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात सहा रुग्णांवर उपचार सुरू असताना बाजीराव काटकर (६९) यांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा वैभव काटकर यांनी दिली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने काही बोलण्यास नकार दिला आहे.

दावडी परिसरात सेवानिवृत्त बाजीराव काटकर हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. २५ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आधी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी २ लिटर ऑक्सिजनची गरज होती. त्यांना म्युकरमायकोसिस आजार झाल्याने त्यांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला काही डॉक्टरांनी दिला होता. बाजीराव काटकर यांचा मुलगा वैभव याचे म्हणणे आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने वडिलांना एम्स रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी १५ लिटर ऑक्सिजनची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. म्युकरमायकोसिस आजाराने त्यांचा एक डोळा बाधित झाला होता. याच आजाराने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांना चांगले उपचार मिळाले नाहीत, असे वैभव यांनी सांगितले. या खासगी रुग्णालयात सहा रुग्ण म्युकरमायकोसिसचे आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाने काही बोलण्यास नकार दिला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)