मुंबईत ३८७९ नवीन रुग्ण - ७७ रुग्णांचा मृत्यू

0


मुंबई - मुंबईत २४ तासांत ३८७९ रुग्ण आढळले असून ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभऱात ३६८६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण ३५ हजार चाचण्या झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या घटते आहे. मंगळवारी २५५४ नवीन रुग्ण आढळले होते. बुधवारी रुग्णसंख्या ३८७९ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी नियंत्रणात आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या ६६५२९९ वर पोहचली आहे. यातील ५९८५४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण १३५४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५१४७२ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९० टक्केवर गेला आहे. तर २८ एप्रिल ते ४ मे पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.५४ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा दर १२३ दिवसांवर पोहचला आहे.


Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)