राणीबाग, नॅशनल पार्कमधील सर्व प्राणी-पक्षी सुरक्षित

0


मुंबई - मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि भायखळा येथील प्राणीसंग्रहालयातील प्राणी, पक्ष्यांची काळजी घेतली जाते आहे. हैदराबाद येथील प्राणी संग्रहातील आठ सिंहाना कोरोनाची लागण झाली असताना मुंबईतील प्राणी, पक्षी सुरक्षित आहे. सॅनिटायझेशन, स्वच्छता, देखरेख आणि सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यानंतर कडक निर्बंध लागू केल्याने भायखळा येथील प्राणीसंग्रहालय पर्यंटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राणीबाग व नॅशनल पार्कातील वाघ, सिंह, बिबटे, अस्वल, कोल्ह्यांसह सर्व प्राणी-पक्षी यांची काळजी घेतली जाते आहे. येथील सर्व प्राणी, पक्षी सुरक्षित आहेत.

हैदराबाद येथील सिंहांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्राण्यांनाही कोरोना होत असल्याचे स्पष्ट आले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व प्राणी संग्रहालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २ सिंह, ७ वाघ, १५ बिबटे पिंजर्‍यात सुरक्षित आहेत. या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची दर १५ दिवसांनी ‘आरटी-पीसीआर’ कोरोना चाचणी करण्यात येत असल्याची माहिती येथील अधिका-य़ाने दिली. शिवाय पिंजर्‍याच्या ठिकाणी कमीत कमी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून काम केले जाते. मांसाहार बॉइल करून दिला जात आहे. तसेच कर्मचारी सॅनिटायझर, मास्क, हँडग्लोव्हचा वापर करतात. पिंजर्‍यांच्या स्वच्छतेआधी सर्व प्राण्यांना बाहेर काढून संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येते. कर्मचारी पिंजर्‍यात जाताना पॉटॅशिअम परमँगनेटच्या पाण्यात पाय बुडवूनच प्रवेश करतात. प्राण्यांमध्ये कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टर किंवा वरिष्ठांच्या नजरेस आणून द्यावे असे निर्देश देण्यात आले आहेत. येथील सर्व प्राणी, पक्षी सुरक्षित असून आवश्यक सर्व देखभाल व खबरदारी घेतली जाते आहे.

राणीबागेत कोरोनाच्या शिरकावाला प्रतिबंध -
पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात २ वाघ, २ बिबटे, कोल्हे, तरस, अस्वल, हत्तीण, हरणे, माकडांसह शेकडो पक्षीही आहेत. कर्मचारी, डॉक्टरांकडून त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेतली जाते आहे. पिंजर्‍यांचे निर्जंतुकीकरण , ठरावीक अंतरावर सॅनिटायझर ठेवण्यात आला. येथे सुमारे ५० कर्मचारी-अधिकारी काम करतात. कोरोनाला कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)