नालेसफाईवरून मनसे, शिवसेना आमने-सामने

Anonymous
0


मुंबई - नालेसफाईच्या कामावरुन शिवसेनेला मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रविराजा यांनी तोफ डागली होती. आता नालेसफाईच्या कामावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. देशपांडे यांच्या आरोपाला प्रतिउत्तर देत मनसेला काही कामधंदा नाही, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी देशपांडे यांना लगावला आहे.

नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार होत असून त्यात सत्ताधारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे, असा आरोप मनसेचे नेते व सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला होता. यावरुन महापौरांनी देशपांडे यांच्यावर टीका करत मनसेला आरोप करण्याशिवाय दुसरे कामच नाही, असे म्हणत त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

नालेसफाईचा तो व्हिडीओ मला देखील आला असून तो मी अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांना पाठविला आहे. ते त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहतील आणि त्यात तथ्य असेल तर संबंधितांवर कारवाई करतील, असेही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)