मुंबईत २४ तासात ७३३ नवीन रुग्ण, १९ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

20 June 2021

मुंबईत २४ तासात ७३३ नवीन रुग्ण, १९ रुग्णांचा मृत्यूमुंबई - मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या एक हजारच्या आत स्थिर राहिली आहे. मागील २४ तासात ७३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ६५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
 
मुंबईत झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. रविवारी ७३३ रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख २१ हजार ३७० वर गेली आहे. तर ६ लाख ८८ हजार ९९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १५२९८ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत १४८०९ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील २४ तासांत २८२२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९५ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७२६ वर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

Post Top Ad

test