१०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

02 June 2021

१०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणारनवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १०० रुपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. ही नोट फाटू शकणार नाही तसेच, तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात भिजणारही नाही, असे सांगण्यात येते.

आरबीआयने १०० रुपयांच्या वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्याची तयारी केली आहे. आरबीआय़ अशा एक अब्ज नोटा छापणार आहे. नोटांना टिकाऊ आणि सुरक्षित बनवणे हा वॉर्निश लावलेल्या नोटा चलनात आणण्यामागचा हेतू आहे. मात्र सध्यातरी केवळ प्रायोगिक तत्त्वावर या नोटा चलनात आणल्या जातील. हा प्रयोग यशस्वी ठरल्यावर अशा नोटा चलनात आणल्या जातील आणि जुन्या नोटा व्यवहारातून बाद केल्या जातील.

रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. १०० रुपयांच्या नोटेचा सरासरी कालावधी अडीच ते तीन वर्षांचा असतो. मात्र या नव्या नोटा सुमारे साडेसात वर्षे टिकतील. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला १०० रुपयांच्या वॉर्निश लावलेल्या एक अब्ज नोटा छापण्यास मान्यता दिली आहे.

Post Top Ad

test