केरळ, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूपाने चिंताजनक स्थिती - केंद्र सरकारचा इशारा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

29 August 2021

केरळ, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूपाने चिंताजनक स्थिती - केंद्र सरकारचा इशारा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसची दुसरी लाट देशाला चांगलीच महागात पडली. या लाटेच्या तडाख्यातून जेमतेम सावरत असतानाच तिस-या लाटेची लक्षणे दिसू लागली आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रूपाने चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे देशात लागू असलेले कोरोना निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहतील, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले. त्यातच महाराष्ट्रात दहिहंडी, गणेशोत्सवसारखे सण आहेत. त्यामुळे एकत्र येण्यावर राज्य सरकारने बंदी घालावी, अशी सूचनाही राज्य सरकारला केली आहे.

ज्या राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत आहे, त्यांनी स्थानिक पातळीवर कठोर निर्णय घेत निर्बंध लागू करावेत, अशी सूचनाही केंद्र सरकारने राज्यांना दिलीे. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा वरचा क्रमांक आहे. तिस-या लाटेचा सर्वात भयंकर परिणाम महाराष्ट्रात दिसू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दोनच दिवसांपूर्वी दिला होता. गेल्या काही दिवसांत केरळमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचेही टेन्शन वाढले आहे. पॉझिटिव्हिटी रेट ५ वर
आणि मृत्यूदर दोन्ही वाढत असल्याने तिसरी लाट आणखी भयंकर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध पुढचा महिनाभर कायम राहतील, असे आदेश केंद्राने जारी केले आहेत.

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज ३०० ते ४०० ची भर पडत आहे, तर संपूर्ण राज्यात दररोज ३ ते ५ हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण १० टक्के आहे. सध्या राज्यात कोरोनाचे एकूण ५१ हजार ५०० सक्रिय रुग्ण आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्राने महाराष्ट्र सरकारला कोरोनाबाबत सावध करत पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना व्हायरसमुळे वाढणारी संख्या पाहता केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली.

Post Top Ad

test