Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत कोरोनाच्या सर्वात कमी रुग्णांची नोंद, 208 नवे रुग्ण




मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली. त्यादरम्यान रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. त्यात गेल्या काही महिन्यात घट झाली आहे. याआधी 2 ऑगस्टला सर्वात कमी म्हणजेच 259 नवे रुग्ण आढळून आले होते. आज (9 ऑगस्ट) 208 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी रुग्णांची ही नोंद आहे.

मुंबईत सोमवारी 208 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 37 हजार 724 वर पोहोचला आहे. आज 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 954 वर पोहोचला आहे. आज 372 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 15 हजार 389 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 3 हजार 961 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1680 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 1 चाळ आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 35 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 445 तर आतापर्यंत एकूण 84 लाख 39 हजार 521 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत या आधी 1 फेब्रुवारीला 328 तर 2 फेब्रुवारीला 334 तर 26 जुलैला 299 रुग्णांची नोंद झाली होती. 2 ऑगस्टला 259, तर आज 9 ऑगस्टला 208 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom