मुंबईत महिलेवर बलात्कार, गुप्तांगात रॉड घुसवला, एकाला अटक - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

10 September 2021

मुंबईत महिलेवर बलात्कार, गुप्तांगात रॉड घुसवला, एकाला अटकमुंबई - दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबईत झाली आहे. साकिनाका खैराणी रोड येथे रात्री एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. पिडीत महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

साकीनाका येथील खैरानी रोड परिसरातील या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पीडित महिला ३० वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या खूप गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. मात्र, यामध्ये अजून आरोपी सहभागी असावेत, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती झाल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपीला अटक, तपास सुरू -
या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
- महेश्वरी रेड्डी, पोलीस उपायुक्त

Post Top Ad

test