महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्या - मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

Anonymous
0


मुंबई - साकिनाका येथे महिलेचा बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड टाकण्यात आला. या घटनेत या पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. तसे परिपत्रक १३ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांनी काढले आहे.

कॉलकडे दुर्लक्ष नको -
पोलीस आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार पोलीस नियंत्रण कक्षात दिवसभरात विविध घटनांबाबत हजारो फोन कॉल येतात. या कॉलमध्ये महिलांशी संदर्भात कॉल असल्यास त्या कॉलकडे दुर्लक्ष करू नये. त्याची ड्युटीवरील अधिकाऱ्यांनी तात्काळ नोंद घेऊन कार्यवाही करावी असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

अंधार, निर्जनस्थळी गस्त -
अंधाराची आश्रयस्थान, निर्जन ठिकाणी आढावा घेवून त्या ठिकाणी थिकानी बीट मार्शल, पेट्रोलिंग मोबाईल वाहने यांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी. अंधाराच्या आणि निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था, करण्याकरिता महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा, अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याकरिता संबंधितांकडे प्रस्ताव प्रस्ताव सादर करुन याबाबात पाठपुरावा करावा. निर्जन ठिकाण अंधाराच्या जागा या ठिकाणी क्यू आर कोड लावावेत. जेणे करून गस्तीवरील वाहने, गस्त करणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांचा वावर होऊन अनुचित प्रकार टाळता येईल व त्यास प्रतिबंध करता येईल. रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलीस अधिकारी / अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तात्काळ योग्य ती मदत देण्यात यावी9. गरज भासल्यास सदर महिलेस सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी.

गस्त घालण्याबाबत -
पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी महापालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी. ताईच त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक ५ ने गस्त घालावी. गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी / अंमलदार संशयित इसमाना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करून त्यांच्याकडे त्या ठिकाणी येण्याच्या प्रयोजनाबाबत चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

आरोपींवर कारवाई -
पोलीस ठाणे हददीतील अंमली पदार्थांची नशा करणारे व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. पोलीस ठाणे हददीत रस्त्यावर बेवारसरित्या बऱ्याच काळापासुन उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, ट्रक व गाडयांच्या मालकांचा शोध घेवुन वाहने त्यांना तेथुन काढण्यास सांगणे अन्यथा अशी बेवारस वाहने ताब्यात घेवुन पुढील कारवाई करावी. महिलांसंबंधीत गुन्हयात कलम ३५४ , ३६३ , ३७६ , ५०९ भादवि व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा ( Sexual offender list ) व अशा सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी.

महिलांना सुरक्षित स्थळी पोहचवा -
ज्या पोलीस ठाणेच्या हददीत रेल्वे स्थानके आहेत व बाहेरून येणाऱ्या लांब पल्याच्या गाडया थांबतात अशा सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्ताकरीता एक मोबाईल वाहन रात्रौ २२ वाजता ते सकाळी ७ वाजे पर्यंत तैनात करण्यात यावी. मोबाईल वरील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी एकटया येणाऱ्या महिलांची विचारपूस करावी, तसेच त्यांना योग्य ती मदत करून त्यांना इच्छित स्थळी पोहचण्याकरीता वाहनांची गरज असल्यास वाहन उपलब्ध करून त्या वाहनांचा क्रमांक, वाहनावरील चालकाचा मोबाईल क्रमांक नोंद करून घेतील. संबंधीतांनी नमूद एकटया महिलेस विहित स्थळी सुरक्षित पोहचविले आहे किंवा कसे, याबाबत खात्री करावी.

ज्या पोलीस ठाणे हदीत रेल्वे स्थानके आहेत अशा पोलीस ठाणेतील रात्रीच्या गस्तीवरील अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर भेटी दयाव्यात व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. या सुचनांची सर्व संबंधीतांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यात कोणीही दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)