२७ दिवसानंतर आर्यन खानची ''मन्नत-वापसी''

Anonymous
0

मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्र्ग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेला शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची अखेर मुक्तता झाली आहे. तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला असून, तिथून तो ‘मन्नत’ या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाला. यावेळी आर्थर रोड तुरुंगाबाहेर शाहरूख खानच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली होती. त्यावेळी एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती.

आर्यन खानला क्रुझ ड्रग्ज प्रकरणी गुरुवारी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण काल सुटकेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कालची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार लागली. आज अगदी सकाळीच आर्यनच्या सुटकेची प्रकिया सुरु झाली. सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. अखेर ११ च्या सुमारास आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर पडला. आर्यनच्या स्वागतासाठी मन्नत बंगल्यावरही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी करण्यात आली होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)