रस्ते अपघातातील व्यक्तीला रुग्णालयात पोहचवणाऱ्याला 5 हजाराचे बक्षीस

JPN NEWS
0


मुंबई - रस्त्यावर एखादा अपघात झाल्यास त्या व्यक्तीला मदत करण्यास कोणीही पुढे येत नाही. यामुळे कधी कधी त्या व्यक्तीचा जीवही जातो. यासाठी रस्ते अपघातात (Road Accident) जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवण्यास मदत करणा-या व्यक्तीला 5 हजार रुपये रोख रक्कम (Cash) तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने या योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेसंदर्भात केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सूचना देण्यात आल्या आहेत. 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत या योजनेचा कालावधी असेल असे सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना प्रामाणिकपणे मदत करणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

रस्ते अपघातांमुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हा सुद्धा या योजनेमागचा हेतू आहे. रोख बक्षिसासोबतच मदत करणा-या व्यक्तीला एक प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. तसेच या पुरस्काराव्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर सर्वात प्रामाणिकपणे मदत करणा-या 10 नागरिकांना एक-एक लाख रुपयांचा पुरस्कार देखील देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !