माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव, आई मुस्लिम - समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

JPN NEWS
0


मुंबई - माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझी खासगी कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे अपमानास्पद असल्याचे म्हणत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (sameer-wankhede) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते.

महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैयक्तिक आरोपांमुळे मी दु:खी आहे. माझी माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा यामागे उद्देश आहे. हे माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचे उल्लंघन आहे, असे समीर वानखेडे म्हणाले. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे राज्याच्या एक्साईज खात्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते हिंदू होते. माझी आई दिवंगत झहिदा ही मुस्लिम होती. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे, मला याचा अभिमान आहे. मी २००६ मध्ये डॉ. शबाना कुरेशी हिच्याशी कायदेशीररित्या विवाह केला होता. तसेच २०१६ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोटही घेतला होता. २०१७ मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर हिच्याशी विवाह केला, असे वानखेडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

समीर वानखेडे नक्की कोण? -
नवाब मलिक यांनी आरोप केले. त्यानंतर समीर वानखेडे यांनी आरोप फेटाळले आणि माझ्या गावी जाऊन तपासा मी कोण आहे? असं आव्हानच मलिक यांना दिलं. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने थेट वानखेडे यांचं गावच गाठलं आणि वानखेडेंबाबतची मूळ माहिती मिळवली. समीर वानखेडे यांचे मूळगाव असलेले वरूड तोफा हे वाशीम जिल्हयातील रिसोड तालुक्यात येत असून वाशीम-रिसोडवरील आसेगावपासून ५ किमी अंतरावर आहे. याठिकाणी समीर वानखेडे यांची वडिलोपार्जीत शेती व घर असून त्यांचे चुलत भावंड राहतात. सध्या त्यांचे काका शंकरराव कचरूजी वानखेडे हे सेवानिवृत्त असून सध्या वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे यांचे मूळ कागदपत्रे बघितली असता त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचं दिसून आलंय.

नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे असे ट्विट केल्यानंतर वानखेडे यांनी माझ्या मूळगावी जाऊन तपासा असे सांगितल्यानंतर समीर वानखेडे यांचे काका राहत असलेल्या वाशिम येथे येऊन त्यांच्याशी संपर्क साधला. माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे मुंबईला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना टोपण नाव दिल असेल. मात्र हे राजकीय आरोप आहेत. माझ्या भावाचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हेच तर पुतण्याचे समीर ज्ञानदेव वानखेडे हेच असल्याचं शंकरराव वानखेडे यांनी सांगितलं.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !