Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Omecron - एचआयव्हीच्या विषाणुमुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन



मुंबई - सध्या जगभर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने खळबळ माजवली आहे. अशातच काही नवे दावे काही नवी माहिती समोर येत आहे. हा सगळ्यात जास्त धोकादायक विषाणू असल्याचे दावे केले जात आहेत. लंडनमधील यूसीएल जेनेटीक इंस्टीट्यूटच्या एका वैज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार हा व्हेरिएंट आला कसा हे अद्याप स्पष्ट नाही. पण एखाद्या HIV रुग्णाच्या इम्यूनो कंप्रोमाईज्ड व्यक्तीपासून क्रोनल इन्फेक्श झालं असेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. अफ्रिकेत याचे काही रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचा हा नवा विषाणू पहिल्या विषाणुपेक्षा 30 पट अधिक वेगानं पसरत असल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वात जास्त धोकादायक विषाणू असल्याचं बोललं जातंय.

पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या 2 लाटांच्या जगासह भारताला आणि महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात झळा बसल्या आहेत. त्यातून धडा घेत केंद्र आणि राज्य सरकार तातडीनं कामाला लागलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तातडीनं पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुंबई महापालिकेकडून दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यात येत आहे. कोरोनानं गेल्या 2 वर्षांपासून अनेक कटू प्रसंग पाहण्यास भाग पाडलं आहे. दक्षिण अफ्रिकेसह इतर काही देशातून येणाऱ्या लोकांना 14 दिवस क्वारंटाईन करुन ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना 48 तासांच्या आत कोरोना चाचणीचा अहवाल देणं बंधनकारक असणार आहे. आतापर्यंत भारतात नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आला नाही, मात्र संभाव्य धोका ओळखून उपाययोजन करण्यास सुरूवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom