मुंबईत कोरोनाचे २१३ नवीन रुग्ण, तीन रुग्णाचा मृत्यू

Anonymous
0


मुंबई - मुंबईत रविवारी (२१ नोव्हेंबर) कोरोनाच्या (Mumbai Corona Update) २१३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्य़ांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने (Bmc Health Department) दिली.

मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटली आहे. मृतांचे प्रमाणही कमी झाल्याने कोरोनास्थिती सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. रोज तीनशे ते अडीचशेच्या आत रुग्णांची नोंद होत रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख ६१ हजार १४६ वर गेली आहे. तर ७ लाख ३९ हजार ७०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १६३०६ झाला आहे. सद्यस्थितीत २५७७ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मागील २४ तासांत ३१८०१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २४०३ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)