मुंबईत कोरोनाचे आज 218 नवे रुग्ण, 1 रुग्णाचा मृत्यूमुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून दोन लाटा आटोक्यात आल्या आहेत. यामुळे रुग्ण संख्येत घट झाली असून दिवसाला 200 ते 300 रुग्ण आढळून येत आहे. आज मंगळवारी 16 नोव्हेंबर रोजी 218 नवे रुग्ण आढळून आले असून फक्त 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 11 मार्च 2020 पासून आज 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत एकूण 7 लाख 59 हजार 995 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 38 हजार 343 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 16 हजार 297 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2031 दिवस इतका आहे. 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने 15 इमारती सील करण्यात आल्या आहेत. रुग्ण शोधून काढण्यासाठी आतापर्यंत एकूण 1 कोटी 19 लाख 59 हजार 724 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Previous Post Next Post