संयुक्त महाराष्ट्र कलादालनात शिवशाहीर पुरंदरे यांचे कलादालन उभारा - भाजपची मागणी

Anonymous
0


मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घरा घरात पोहोचवणारे शिवशाही बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे लिखाण, संशोधन याची माहिती पुढच्या पिढीला होणे गरजेचे आहे. यासाठी दादर शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील संयुक्त महाराष्ट्र कलादालनात (United Maharashtra Art Gallery)
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पहिल्या मजल्यावर कलादालन उभारा, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याकडे करण्यात आली आहे, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Bjp Leader Prabhakar Shinde) यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घरा घरात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. परंतु त्यांनी केलेल्या कार्याची आठवण कायम मनात राहणार आहे. बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे कार्य कायम आठवणीत राहणारे आहे. त्यांनी केलेले विपुल लेखन, साहित्य व ऐतिहासिक संशोधन हे पुढच्या पिढीला उपलब्ध व्हायला हवे. यासाठी दादर शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र कलादालनात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन पहिल्या मजल्यावर उभारा, अशी मागणी महापौरांकडे केल्याचे ते म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)