लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीचा काढला काटा, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

Anonymous
0


मुंबई - कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कंपाऊंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर गुरुवारी 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा संशय होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. तपासामध्ये लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने तीचा काटा काढल्याचे समोर आले आहे.

लग्नाचा तगादा लावल्याने काटा काढला -
कुर्ल्याच्या एचडीआयएल कंपाऊडमधील ही इमारत बंद असते. मात्र 18 वर्षांचा एक तरुण आपल्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने सर्वात आधी तरुणीचा मृतदेह पाहिल्याची माहिती आहे. तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सर्वप्रथम या प्रकाराची माहिती दिली.या तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृत तरुणीचा प्रियकर रेहान शेख (20) आणि त्याचा मित्र फैजल शेख (20) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणीने लग्नासाठी आरोपीच्या मागे तगादा लावला होता, पण त्याला तिच्याशी लग्न करायचे नसल्यामुळे त्याने मित्र फैजलच्या मदतीने तिची हत्या केली, असं चौकशीत समोर आलं. प्राथमिक चौकशीत आरोपीने हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार केला नसल्याचे पोलिसांना सांगितले होते, पण पोलीस त्याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)