मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ

0


मुंबई - मुंबईत (Mumbai) गेल्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑक्टोबरच्या तुलनेत नियंत्रणात असलेल्या साथीच्या आजारांनी (monsoon deceases) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामध्ये आठवडाभरात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली असून ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे ८०, डेंग्यू - २३, गॅस्ट्रो - ७२, चिकनगुनीया - ७ तर लेप्टोचे ४ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाटही चांगलीच नियंत्रणात आली असली तरी साथीच्या आजारांचे टेन्शन कायम असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात वाढणार्‍या साथीच्या आजारांचे संकट अजूनही कमी झालेले नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या अहवालानुसार मुंबईत साथीचे आजार आटोक्यात आल्याचे समोर आले होते. यामध्ये मलेरियाचे ७२ रुग्ण, लेप्टो - १, डेंग्यु - ४७, गॅस्ट्रो - ४९, हिपेटायटिस - ६, चिकनगुनिया - ६ आणि ‘एच१एन१’चा १ रुग्ण आढळला होते. तर संपूर्ण ऑक्टोबरमध्ये मलेरियाचे ५७६ रुग्ण, लेप्टो - ३१, डेंग्यु - २५४, गॅस्ट्रो - २४७, हिपेटायटिस - ४१, चिकनगुनिया - ३३ आणि ‘एच१एन१’चे ८ रुग्ण आढळले होते.मात्र नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात मात्र साथीच्या आजारांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)