मुंबईत २३० नवीन रुग्ण, एका रुग्णाचा मृत्यू

0


मुंबई - मुंबईत गुरुवारी (१८ नोव्हेंबर) २३० रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २०४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्य़ांना घरी सोडण्यात आले.

मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटली आहे. मृतांचे प्रमाणही कमी झाल्याने कोरोनास्थिती सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. रोज तीनशे ते अडीचशेच्या आत रुग्णांची नोंद होत रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख ६० हजार ५०० वर गेली आहे. तर ७ लाख ३८ हजार ८०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १६ हजार ३०० झाला आहे. सद्यस्थितीत २८४५ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मागील २४ तासांत ३८ हजार ८२४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २१८७ दिवसांवर गेला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)