मुंबईत ७ दिवसांत मलेरिया ७२, डेंग्यू ४७, गॅस्ट्रोच्या ४९ रुग्णांची नोंद

Anonymous
0


मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आले असताना साथीच्या आजाराचा धोका वाढला आहे. १ ते ७ नोव्हेंबर या ७ दिवसांत मलेरियाचे ७२, डेंग्यू ४७, गॅस्ट्रो ४९, चिकनगुनिया ६ व स्वाईन फ्लूचा १ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत साथीच्या आजारांचे प्रमाण अजूनही कमी झालेले नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

मुंबईत मलेरिया, डेंग्यू, कावीळ या आजाराचे प्रमाण वाढते आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मलेरिया, गॅस्ट्रो, डेंग्यु, लेप्टोच्या रुग्णात वाढ झाली आहे. सुदैवाने या आजाराने एकाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, साथीच्या आजारांचा धोका कायम असल्याने मुंबईकरांनो योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

१ ते ७ नोव्हेंबर दरम्यान आढळलेले रुग्ण
मलेरिया - ७२
डेंग्यू - ४७
गॅस्ट्रो - ४९
चिकनगुनिया - ६
कावीळ - ६
स्वाईन फ्ल्यू - १
लेप्टो - १

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)