मुंबईत वैद्यकीय कर्मचा-यांची ४५ टक्के पदे रिक्त, १५ दवाखानेच १४ तास सुरु

Anonymous
0


मुंबई - मुंबईत वाढणा-या लोकसंख्येच्या तुलनेत १५०० लोकसंख्येमागे एक याप्रमाणे ८५८ सरकारी दवाखान्यांची गरज आहे. मात्र सध्या १९९ दवाखानेच उपलब्ध आहेत. यातील १८७ दवाखान्यापैकी फक्त १५ दवाखानेच १४ तास सुरु असून उर्वरित ५ ते ८ तासच सुरु असतात. शिवाय मागील पावणे दोन वर्षापासून कोविडशी लढा सुरु असतानाही ४५ टक्के वैद्यकीय कर्मचा-यांची पदे भरण्यात आलेली नाही अशी माहिती प्रजा फाऊंडेशनने सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे मुंबईतील आदर्श जाहिरनामा बुधवारी जाहिर केला, यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेतील वस्तूस्थिती मांडली.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी साडेचार हजार कोटी कोटी रुपयाची तरतूद केली जाते. मागील दोन वर्षापासून कोविड या विषाणूशी लढा सुरु आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यांची गरज आहे. राष्ट्रीय इमारत बांधकाम संहितेतील मानकांनुसार दर १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक आहे. परंतु सध्या फक्त १९९ दवाखाने आहेत. यातील १८७ दवाखान्यापैकी १५ दवाखानेच १४ तास सुरु आहेत. उर्वरित दवाखाने अत्यंत कमी वेळ चालतात. तसेच २०२० पर्यंत वैद्यकीय आणि पॅरा- वैद्यकीय कर्मचा-यांची अनुक्रमे ४४ टक्के व ४५ टक्के पदे रिक्त आहेत. कोविडसारख्या आपत्कालीन परिस्थितीत सक्षमपणे आरोग्य व्यवस्थापन होण्यासाठी ही पदे क्वरीत भरली जाणे आवश्यक असल्याची प्रजा फाऊंडेशनने सूचवले आहे. आरोग्य केंद्र आणि आपत्कालीन सेवांच्या कामकाज प्रक्रियेचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करण्याची आणि सुधारणेच्या लक्ष्याधारित उपाययोजना राबवण्याची आवश्यता असल्याचे प्रजा फाऊंडेशनने म्हटले आहे. मुंबई फर्स्ट आणि प्रजा फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे केलेल्या अभ्यासात सद्यस्थितीत मुंबईत प्राथमिक आरोग्य सेवांच्या प्रत्यक्ष गरजा आणि त्रूटी यांचा आढावा घेतला आहे. यात त्यांनी तज्ज्ञांच्या सूचनांची नोंद केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी कोणती कृती योजना आखली पाहिजे हे आपल्या जाहिरनाम्यात मांडले आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईच्या विकासासाठी नवे लोकप्रतिनिधी निवडण्य़ाची वेळ येऊन ठेपली आहे. कोविड काळात आरोग्य सेवेतील त्रूटी प्रशासनाच्या लक्षात आल्या असतील. या त्रूटी समजून घेऊन यंत्रणेतील त्रूटी दूर करण्यासाठी व गुणवत्ता वाढवण्यासाठी ठोस योजना प्रजाने तयार केली आहे. यातील काही सूचनांचा जाहिरनाम्यामध्ये समावेश करावा असे आवाहन मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरींदर नायर यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)