महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करामुंबई - जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोनाचे निय़म पाळून साध्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. कोणत्याही प्रकारचे गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रम होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित न येता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरूनच अभिवादन करा असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या ६ डिसेंबरला महापरिनिर्वान बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून अनुयायी येत असतात. कोरोनामुळे मागील वर्षी महापरिनिर्वानदिनी निर्बंध असल्याने बाबासाहेबांना ऑनलाईन घरूनच अभिवादन करण्यात आले. सद्या कोरोनाचीस्थिती नियंत्रणात आल्याने निर्बंधात शिथीलता देण्यात आली. सर्वकाही पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण आफ्रिकामध्ये ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या विषाणूने धुमाकूळ घातला असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वान दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क व परिसरात गर्दी होऊ नये यासाठी महापरिनिर्वानदिन कोरोनाचे निय़म पाळून साध्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात एकत्रित आल्यास गर्दी होईल त्यामुळे खबरदारी म्हणून बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करा असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे. या दिवशी दूरदर्शनवर दिवसभर थेट प्रक्षेपण केले जाईल असे प्रशासनाने म्हटले आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना -
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी गर्दी न करता साध्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करावा
- कोरोना नियमालीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल
- चैत्यभूमीवरून दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. त्यामुळे महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर न येता घरूनच अभिवादन करावे
- कार्यक्रमाच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर, मास्क व सोशल ड़िस्टनसिंगचे पालन करणे बंधनकारक
- चैत्यभूमी परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्य पदार्थ, पुस्तकांचा स्टॅाल लावू नये, तसेच परिसरात सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने, मोर्चे काढू नयेत.

Post a Comment

Previous Post Next Post