मुंबईत ओमायक्रॉनची इंट्री, 2 प्रवासी पोजिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या १० वर

Anonymous
0


मुंबई - मुंबईत दोन रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे आज (दिनांक ०६.१२.२०२१ रोजी) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून जिनोम सिक्वेनसिंग चाचण्यांमधून समोर आले आहे. राज्यात आतापार्यंत डोंबिवली येथे १, पिंपरी चिंचवड येथे ६, पुणे येथे १ तर मुंबईत २ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १० झाली आहे. 

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय पुरुष दक्षिण आफ्रिका येथून दि . २५.११.२०२१ रोजी आला होता. दि . २९.११.२०२१ रोजी त्याची कोविड चाचणी पॉजिटीव्ह आल्याने सदर नमुना जिनोम सिक्वेनसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाने कोविड लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. सदर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. 

सदर रुग्णाचे सहवासितांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची कोविड चाचणी पॉजिटीव्ह आली व त्यामध्ये देखील ओमायक्रॉन संसर्गाचे निदान झाले आहे. संपर्कातील रुग्ण ही ३६ वर्षीय महिला असून ती दि . २५.११.२०२१ रोजी अमेरिकेतून भारतात आली. तीची दि . ३०.११.२०२१ रोजी कोविड चाचणी पॉजिटीव्ह आल्याने सदर नमुना जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाने कोविड लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. सदर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाचे सहवासितांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही पॉजिटीव्ह आलेले नाही. 

मुंबई शहरात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यामध्ये अतिजोखामिच्या देशातून आलेल्या प्रवाश्यांपैकी १६ प्रवाश्यांचे कोविड निदान झाले असून त्यामध्ये १२ पुरुष व ४ स्त्रिया यांचा समावेश आहे. सदर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामधील एक रुग्ण ओमायक्रॉन बाधित आहे. तसेच सहवासितांच्या सर्वेक्षणामध्ये ९ नागरींकांचे ( ४ पुरुष , ५ स्त्रिया ) कोविड निदान झाले असून त्यात एक ओमायक्रॉन बाधित आहे. 

मुंबई विमानतळावर दि . ०५.१२.२०२१ पर्यंत अतिजोखामिच्या देशामधून ४४८० प्रवाश्यांचे आगमन झाले असून त्यापैकी विमानतळावर होणाऱ्या चाचाण्यांपैकी ४ मुंबई निवासी प्रवाश्यांचे कोविड निदान झाले असून त्यामध्ये चारही पुरुष आहेत. सदर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुने जनुकीय विश्लषणासाठी पाठविण्यात आले आहेत. 

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनाही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या आरोग्य विभागाच्या वतीन सर्व जनतेला करण्यात येत आहे .
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)