Omicron - राज्यभरातील २८ परदेशी प्रवाशांची जिनोम सिक्वेनसिंग चाचणी

Anonymous
0


मुंबई - जगभरात ओमायक्रोन विषाणूचा धोका वाढल्याने मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. १ नोव्हेंबर पासून आतापर्यंत तपासणीतील एकूण २८ नमुने जनुकीय तपासणी म्हणजेच जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १२ नमुने एन आय व्ही पुणे येथे तर १६ नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. या एकूण २८ जणांपैकी २५ जण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ३ जण त्यांचे निकटसहवासित आहेत .

आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८६१ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ जण आर टी पी सी आर पॉझिटिव्ह आले आहेत. या तिघांचेही नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु असून विमानतळ आणि क्षेत्रिय अशा दोन्ही सर्वेक्षणातून आतापर्यंत एकूण २८ नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १२ नमुने एन आय व्ही पुणे येथे तर १६ नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. या एकूण २८ जणांपैकी २५ जण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ३ जण त्यांचे निकटसहवासित आहेत . 

परदेशी प्रवाशांनी माहिती द्या - 
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)