मंदिराच्या नावाखाली दलितांच्या जमिनी हडपण्याचा भाजपचा प्रयत्न - प्रियंका गांधी

Anonymous
0


नवी दिल्ली : लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा लाभ घेऊन भाजप नेते आणि राज्यातील अधिकारी दलितांच्या जमिनी मंदिराच्या नावाखाली हडपण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. (bjps attempt to grab dalits land under the name of temple)

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ज्या प्रकारे मंदिर, मशिदीच्या मुद्द्यावर राज्यात ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे आणि राम मंदिराच्या आडून काशी व मथुरेचा प्रचार करून मत विभागणी करू इच्छित आहे. त्याविरुद्ध काँग्रेसने आवाज उठविला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना जबाबदार ठरवीत आरोप केला की, अगोदर निधीचा घोटाळा केला आणि आता जमीन हडपली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. मंदिर उभारणीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडूनच याची चौकशी झाली पाहिजे. दोन कोटींची जमीन राम मंदिर न्यासकडून २६.५० कोटीत खरेदी झाल्याचे समोर आले होते आणि त्यावरून गदारोळ झाला होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)