ओमायक्रॉनचा प्रसार वाढल्यास शाळा पुन्हा बंद - वर्षा गायकवाड

Anonymous
0


मुंबई - जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झालेल्या कोरोनाच्या कारणामुळे पुन्हा एकदा बंद होण्याची भीती आहे. राज्यात ओमायक्रॉन बाधितांची प्रकरणे वाढत राहिल्यास पुन्हा शाळा बंद (corona cases rise then school will be closed) करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले. शाळा सुरू करण्याच्या SOP नुसार, शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवेल असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

नवी मुंबईच्या घनसोली येथे अठरा विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आम्ही लगेच त्यांना विलगीकरणामध्ये पाठवले होते. आम्ही पूर्ण तयारी करूनच टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक ओमायक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे आढळत आहेत, त्या ठिकाणी तिथे स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभाग निर्णय घेत आहे. आम्ही याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. जर ओमायक्रोन कोरोना संसर्गाची संख्या वाढली तर आम्हाला शाळा बंद करण्याबाबतही विचार करावा लागू शकतो असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)