माझगाववासीयांचे लक्ष्य वेधून घेतेय संविधानाची उद्देशिका

0


मुंबई - माझगांव येथील महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या  अश्वारूढ पुतळ्याबरोबरच भारतीय संविधानाची उद्देशिका आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या उद्देशिकेचे अनावरण नुकतेच करण्यात आले. सध्या ते माझगाववासीयांचे लक्ष्य वेधून घेत आहे. (It attracts the attention of Mazgaon residents Objectives of the Constitution)

शिवसेना उपनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रयत्नाने व संकल्पनेतून माझगावच्या महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा साडेचार टनाचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा साकारत असतानाच महाराणा प्रताप चौकाचे नेत्रदीपक सुशोभीकरण देखील करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून संविधानाची देखणी उद्देशिका आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. संसदेची प्रतिकृती, त्यावर संविधान, आणि त्यासोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भावमुद्रा आणि शेजारीच ठळक अक्षरात लिहिलेली संविधानाची उद्देशिका सध्या माझगाववासीयांचे लक्ष्य वेधून घेत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)