दलित पँथर स्थापनेचा राज्यव्यापी सुवर्ण महोत्सव

Anonymous
0


मुंबई - दलित पँथर या लढाऊ संघटनेच्या स्थापनेला येत्या ९ जुलैला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पँथरच्या या सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरा करण्याच्यादृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. पँथर चळवळीतील प्रमुख नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. यावेळी साहित्यिक अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, चंद्रकांत हंडोरे, दिलीप जगताप, प्रेम गोहिल आदी उपस्थित होते.

दलित पँथर ही लढाऊ संघटना म्हणून ओळखली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक, आर्थिक समतेचा विचार दलित पँथरच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडला गेला. अन्याय, अत्याचाराविरोधी लढत असताना जगण्याच्या इतर समस्यांवरही पँथरने आवाज उठविला. या संघटनेच्या स्थापनेला येत्या ९ जुलै २०२२ रोजी ५० वर्ष पूर्ण होेत आहे. या निमित्ताने पँथरचा सुवर्ण महोत्सव राज्यभरात साजरा केला जाणार आहे. यासाठी व्यापकपणे विचार करण्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात यशवंतराव चव्हाण येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वितारवंत, साहित्यिक, बुद्धीजीवी, पत्रकार, व प्रमुख कार्येक र्ते यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यावेळी एक समिती गठित केली जाणार आहे, अशी माहिती दलित पँथरचे संस्थापक सदस्य अर्जुन डांगळे यांनी दिली आहे. आंबेडकरी चळवळीतील पँथर ही लक्षणीय व प्रेरणादायी घटना आहे. त्यामुळे मतभेदाच्या पलिकडे जाऊन हा उत्सव साजरा केला जाईल असे आवाहनही डांगळे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)