Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

सर्वोच्च न्यायालयाने केले त्या १२ आमदारांचे निलंबन रद्द - भाजपला दिलासा तर सरकारला धक्का



नवी दिल्ली / मुंबई - विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामूळे भाजपच्या १२ आमदारांवर एक वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याविरोधात भाजप ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने ही निलंबनाची कारवाई रद्द केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून महाविकास आघाडीला सरकारला धक्का बसला आहे.

जुलै २०२१ मध्ये विधानसभेत असभ्य व असंसदीय वर्तणूक केल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची कारवाई केली. या निर्णयाला भाजप आमदार आशिष शेलार व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी, न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेवरील सर्व युक्तिवाद गेल्या आठवड्यात संपले. न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयानं या प्रकरणात निकाल दिला. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण -
गेल्या वर्षी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर विधानसभेत चर्चा सुरू असताना राजदंड उचलणं, माईक खेचणं, त्याचबरोबर अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करणं, शिवीगाळ करणं, अपशब्द वापरून गैरवर्तन करणं, यासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं.

हे आहेत निलंबित आमदार - 
आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)
अभिमन्यू पवार (औसा)
गिरीश महाजन (जामनेर)
पराग अळवणी (विलेपार्ले)
अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)
संजय कुटे (जामोद, जळगाव)
योगेश सागर (चारकोप)
हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)
जयकुमार रावल (सिंधखेड)
राम सातपुते (माळशिरस)
नारायण कुचे (बदनपूर, जालना)
बंटी भांगडिया (चिमूर)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom