टिपू सुलतान नामकरणावरून कोलांट्या उड्या का - भाजपचा महापौरांना सवाल 

JPN NEWS
0

मुंबई - दोन दिवसांपूर्वी मालाड येथील उद्यानास 'राणी लक्ष्मीबाई उद्यान' असे नाव देण्याची मागणी करणाऱ्या मुंबईच्या महापौर महोदय आता कोलांटी उडी घेत टिपू सुलतानचे समर्थन का करत आहेत? तसेच ही जागा सांडपाणी प्रकल्पासाठी राखीव  होती. त्या आरक्षणात कोणी बदल केला असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केले आहेत. (U turn from the naming of zashichi rani)


एम / पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरु होऊन रफिनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्र.४ ह्यास 'शहीद टिपु सुलतान मार्ग' असे नाव देण्याबाबत, महापालिकेने आपला दि.२७ डिसेंबर २०१३ चा ठराव क्र. १२९० अन्वये घेतलेल्या निर्णयाचा, महापालिका, ह्याद्वारे, फेरविचार करीत आहे. तसेच अंधेरी (प) येथील भवन्स महाविद्यालयापासून सुरु होऊन गिल्बर्ट हिल मार्गे सी.डी. बर्फिवाला मार्गाच्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास 'शेर-ए- हैसूर टिपु सुलतान मार्ग' असे नाव देण्याबाबत, महापालिकेने आपला दि.२३ एप्रिल २००१ चा ठराव क्र. ५२ अन्वये घेतलेल्या निर्णयाचा, महापालिका, ह्याद्वारे, फेरविचार करीत आहे. या ठरावाच्या सूचना विचारार्थ का घेण्यात आल्या नाहीत अशी विचारणाही शिंदे यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)