Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट - दिवसभरात २५५० नवीन रुग्णांची नोंद



मुंबई - मुंबईत झपाट्याने वाढलेल्या रुग्णसंख्येचा आलेख मागील काही दिवसांपासून मोठ्या फरकाने घसरतो आहे. मुंबईतील २० हजारावर गेलेल्या रुग्णसंख्येत दिलासादायक घट झाली आहे. रविवारी २५५० रुग्णांची नोंद झाली. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मागील काही दिवसांपासून आता पुन्हा उतरू लागली आहे. तब्बल २० हजाराच्या पार गेलेली रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. रविवारी मुंबईत नवीन २५५० रुग्णांची नोंद झाली असून १३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २४ तासात २१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. घटलेल्या रुग्णांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. तब्बल २० हजारांवर रुग्णसंख्या गेल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. मात्र मागील काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्य़ा रोखण्यात पालिकेला यश आले आहे. १२ जानेवारी रोजी १६ हजारांवर पोहोचलेली रुग्ण संख्या १३ ते १५ जानेवारीदरम्यान पुन्हा उतरणीला लागली आहे. त्यानंतर रोज मोठ्या फरकाने रुग्णसंख्या घटली आहे. रविवारी २५५० रुग्ण आढळले.

आतापर्यंतची रुग्णसंख्या १,०३४,८३३ वर पोहचली आहे. दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची संख्या १६,५३५ झाली आहे. दिवसभरात २१७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ९९५,७८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९६ टक्के, तर रुग्णदुपटीचा कालावधी ११५ दिवसांवर आला आहे. दिवसभरात ४५,९९३ चाचण्या करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom