खाऊ देण्याचे आमिष दाखवत सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

0


वर्धा - वर्धाच्या समुद्रपूर तालुक्यात तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना धुळ्यात एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना धुळ शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीत घडलीय. याप्रकरणी 56 वर्षाच्या नराधमास स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

18 फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास सिल्ली गावात तीन मुली रस्त्यावर खेळत होत्या. त्यावेळी टिन पिप्याचे काम करण्यासाठी गावात आलेल्या नराधम केशव बावसु वानखेडे यांने या मुलींना पैसे दिले. तसेच त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, यातील एका मुलीनं आरोपीकडून आपली सुटका करीत पळ काढला. तसेच आपल्यासोबत घडलेल्या संपूर्ण प्रकार तिच्या आईच्या कानावर घातला. या घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नराधम दोन चिमुकल्यांवर अत्याचार करताना आढळून आला. यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडून गिरड पोलिसांच्या ताब्यात दिलंय. बळवंत निकम असं संशयित आरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी धुळे शहरातील देवपूर परिसरातील कृषी कॉलनीतील रहिवाशी आहे. तर, संशयित आरोपी हा पीडिताच्या शेजारी भाड्यानं राहत असल्याची माहिती मिळालीय. दरम्यान, पीडिता एकटी असल्याचं बघून संशयित आरोपीनं खाऊ देण्याचं आमिष दाखवत त्याच्या घरात बोलावून घेतलं. त्यानंतर दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. सदर घडलेला प्रकार चिमुकली आपल्या आजीला सांगितला. त्यानंतर आजीनं देवपूर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केलीय. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)