Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पालिका आयुक्त चहल यांच्या भावाकडून सोनू निगमला धमकी


मुंबई - सुप्रसिद्ध गायक व पद्मश्री सोनू निगम (Singer Padmshri Sonu Nigam) यांना मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांचे भाऊ रजिंदर सिंह यांनी धमकी दिली आहे. इकबाल सिंह चहल यांनी विनंती केल्यावरही सोनू निगम यांनी व्यस्त असल्याने कार्यक्रम करण्यास नकार दिल्यावर रजिंदर सिंह यांनी धमकी दिल्याचे समोर आले आहे. (Bmc commissioner chahals brother rajindar has threatened singer sonu nigam)

इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर याने सोनू निगमला धमकी दिली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. सोनू सध्या काही कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची नावं सुचवली. पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले. यातले काही मेसेजेस आक्षेपार्ह आहेत. त्या मेसेजमधली भाषा योग्य नाही. या मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आहे. सोनू निगमला या प्रकरणाचा त्रास होतोय. त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा निघावा अशी त्याची इच्छा असल्याची माहिती आहे. त्यामुळे सोनू निगमने या मेसेजसचे काही स्क्रिनशॉटही सार्वजनिक केले आहेत. रजिंदर हे सध्या इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत राहत असल्याची माहिती आहे.

पद्मश्री सोनू निगम - 
सोनू निगम हा देशातील प्रसिद्ध गायक आहे. त्याने अनेक गाणी गायली आहेत. कल हो ना हो, ऑल इज वेल, अभी मुझमे कहीं ही त्याची निवडक गाणी आहेत. हिरवा निसर्ग हा भवतीने, टिक टिक वाजते डोक्यात ही मराठी गाणीही त्याने गायली आहेत. नुकतंच त्याला पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom