शिवाजी पार्काचा राजकारणासाठी बळी देऊ नका - मनसे

JPN NEWS
0


मुंबई - गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार क रण्यात आल्यानंतर आता या मैदानातच त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. भाजपनंतर काँग्रेसनेही स्मारकाची मागणी लावून धरली आहे. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान दादर वासियांना खेळण्यासाठी अनेकवेळा संघर्ष करून अतिक्रमणापासून वाचवले आहे, तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी देऊ नका अशी प्रतिक्रिया दिली आहे.

लता दीदींवर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसºयाच दिवशी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लता दीदींचे शिवाजी पार्क येथेच स्मृतीस्थळ बांधण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मागणी केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्ही लता दीदींचे भव्य स्मारक उभारणार आहोतच, कुणीही मागणी करून राजकारण करण्याची गरज नाही, असे म्हटले. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्क ला स्मशाभूमी करू नये, बाजूला चांगली मोठी स्मशानभूमी आहे. शिवाजी पार्क मुलांसाठी खेळायला चांगले आहे. या मैदानावर मुलांसाठी खेळांचे आयोजन करण्यात येते. स्मारक उभारण्यासाठी मुंबईत इतर ठिकाणीसुद्धा जागा आहेत असे म्हणत त्यांनी स्मारकाला विरोध केला आहे. यात आता मनसेनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्काचा राजकारणासाठी बळी देऊ नका, असे ट्वीट क रून आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे शिवाजी पार्कावर स्मारकाला मनसेचाही विरोध असल्याचे दिसते आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !