स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड

0


मुंबई - शिवसेना नेते व मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या व त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडून जाधव यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यानंतर ही धाड पडली आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्यावर कारवाई नंतर शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. (Income tax raid on Standing Committee Chairman Yashwant Jadhav's house)

मिळालेल्या माहितीनुसार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावावर काही कंपन्या असून त्यात त्यांनी गुंतवणूक केल्याचा आरोप केला आहे. या कंपन्यांद्वारे यशवंत जाधव यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. याबाबत सोमय्या यांनी इन्कम टॅक्स, ईडी तसेच अन्य तपास यंत्रणांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज सकाळी सहा वाजता त्यांच्या राहत्या घरी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. यशवंत जाधव व त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी केलेल्या व्यवहाराची इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी केली जात आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)