लतादीदींच्या अस्थी प्रभूकुंजवर आणल्या

Anonymous
0


मुंबई - गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना रविवारी शिवाजी पार्क येथे हजारोंच्या संख्येने अखेरचा निरोप दिला. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसह, चाहत्यांनी आदरांजली वाहिली. दरम्यान सोमवारी सकाळी लतादीदींच्या अस्थी प्रभूकुंजवर आणल्या आहेत. संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आदीनाथ यांनी त्यांच्या अस्थी ताब्यात घेतल्या. अस्थींचे दर्शन घेण्यासाठी सोमवारीही सकाळपासून चाहत्यांनी गर्दी केली होती.
लता दिदींच्या अस्थी ताब्यात घेण्यासाठी सकाळी आदिनाथ मंगेशकर शिवाजी पार्क येथे आले होते. त्यांनी अस्थी प्रभूकुंजवर आणल्या. यावेळी लता दिदींच्या चाहत्यांनी अस्थींचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रभूकुंज येथे अस्थी ठेवल्यानंतर विधीवत कार्य पार पडल्यानंतर पुढे या अस्थी समुद्रात सोडण्यात येणार आहे. देशातील पवित्र नद्यामध्ये या अस्थीचे विसर्जन करण्यात येणार असल्याची समजते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)