आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक

0


मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणी तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. (Nawab Malik arrested by ED)

दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते. नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

तर या, शिवाजी पार्कात -
राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, ‘ईडी’ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही. या उलट ती आणखी मजबूत होतेय असेही त्यांनी म्हटले.

२० वर्षांनी चौकशी का ? - 
केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची २० वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

…म्हणून ईडीची कारवाई, रोहीत पवार - 
नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं आहे, भाजपचे काही पदाधिकारी उघडकीस आणले आहेत. इथं उघड झालेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटलं असेल, त्यामुळे कारवाई झाली असेल असे रोहित पवार म्हणाले. गुजरातमध्ये देखील २२ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग सापडले असेे पवार म्हणाले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)