नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी

0


मुंबई - मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात अली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा आदेश दिला आहे. आज पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी पोहचले त्यानंतर मलिक यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले होते. दुपारी तीनच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आल्याचे ईडी कडून सांगण्यात आले. 
(Nawab Malik ED Custody)

दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते. नवाब मलिक हे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं आहे. मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)